Lokmat Latest News | ऑनलाईन केली ऑर्डर आणि पडल्या बेड्या पहा व्हिडिओ | Lokmat Marathi News

2021-09-13 1

आपल्यापेक्षा वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात आंधळा झालेल्या एका १९ वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाने वडिलांची हत्या करण्यासाठी ऑनलाईन बॉम्ब ऑर्डर केला. पण पोलिसांनी त्याला वेळीच बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला ८ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गुरतेज सिंह रंधावा असे या मुलाचे नाव आहे. ३८ वर्षीय महिलेबरोबर प्रेमसंबंध असलेल्या गुरतेज ने टोकाचा निर्णय घेतला. तिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशिनशिप’मध्ये राहायचे इच्या असलेल्या. पण याबद्दल त्याच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे संतप्त झालेल्या गुरतेजने वडिलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. वडिलांची कशाप्रकारे हत्या करण्यात येईल याचा तो विचार करू लागला. त्यातूनच त्याने वडिलांच्या कारमध्ये बॉम्ब लावून ती उडवून देण्याचा कट रचला. त्यानंतर त्याने गूगलवर बॉम्बविषयक माहिती सर्च केली. त्यात बॉम्ब ऑनलाईनही मिळत असल्याचे त्याने वाचले. दिलेल्या संकेतस्थळावर त्याने कारबॉम्बची ऑर्डर दिली



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires